UDISE - 27261003801 स्थापना ०१/१०/१८७३
लोणी खु।।.ता.राहाता, जि .अहिल्यानगर पिन 413713
ब्रिटीशकालीन शाळा असून स्थापना ०१/१०/१८७३ ची आहे. शाळेला १५० वर्षे पूर्ण झालेली आहेत.
सदर शाळेत सहकाराचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, लोकनेते पद्मविभूषण खासदार डॉ. बाळासाहेब विखे पाटील व शिर्डी विधानसभेचे प्रथम आमदार कै. चंद्रभानदादा घोगरे पाटील यांनी शिक्षण घेतलेले असून या शाळेतून आतापर्यंत शिक्षण घेतलेले विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर तसेच इतरही अनेक क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत.
या शाळेत इ. १ ली ते ४ थी वर्ग होते. २०१९ पासून शाळेत इ ५ वी चा वर्ग सुरू करण्यात आला आहे. दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत ५०% पेक्षा जास्त विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण होतात.
दरवर्षी शाळेत सहशालेय उपक्रम, क्रीडास्पर्धा, सहल, सांस्कृतिक कार्यक्रम, स्नेहसंमेलन इ. उपक्रमांचे तसेच विविध राष्ट्रीय कार्यक्रम, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव प्रभावीपणे राबविले जातात शाळेचा पट दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे इ. विविध स्पर्धामध्ये विद्यार्थ्यांनी उत्तम प्राविण्य मिळवून तालुका, जिल्हास्तरापर्यंत यश मिळवले आहे.
मा.ना.राधाकृष्ण विखे पाटील व मा. अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या प्रयत्नातून बांधा वापरा व हस्तांतरीत करा (BOT) तत्वावर भव्य, दिव्य आणि सुंदर अशी इमारत झाली. त्यामूळे शाळेच्या वैभवात आणखीन भर पडली. इतक्या भौतिक सुविधांनी सुसज्ज व आकर्षक जिल्हा परिषदेची शाळा. शालेय गुणवत्ता वाढीसाठी निरंतर प्रयत्नशील आहे.
शाळेत शासना मार्फत दिल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्या, शालेय पोषण आहार, मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश इ. लाभाच्या योजना १००% लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविल्या जातात.
-: संपर्क:-
श्री.गोरक्षनाथ चव्हाण
मो. +91 77989 12881
ईमेल -zppsloniboyes@gmail.com